या नव नवल नयनोत्सवा
दोन दिवसापूर्वी संगीत मानापमान बघितला आणि मनापासून आवडला. अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया वाचताना मनात आल की गेली पाच वर्ष एखाद्या कथेवर सिनेमा करण नक्कीच कठिण होत. जे सुबोध भावे आणि ज्योती देशपांडे ह्यांनी शिवधनुष्यासारख पेलल आहे. माझ्यासाठी मात्र हा सिनेमा आठवणीचा परिमळ ठरला. कारण नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे माझ्या आजीचे (माझ्या वडिलांची आई) सख्खे काका! आणि माझी आजी वडिलांच्या लहानपणी गेल्यामुळे तिच्या भावांकङे सांगलीला माझे वडिल लहानाचे मोठे झाले. मामांमध्ये मोठे दादा नंतर बापू, नाना, केशवराव आणि चिंतामणराव... आणि खाडिलकर वाङ्यात हे एकत्र कुटुंब नाती जपत रहात होते. नाट्याचार्याचा उल्लेख नेहमी काकासाहेब असाच होत असे. माझे वडिल बी.ए. झाल्यावर त्यांना सैन्यात जायच होत किंवा वकिल व्हायचं होत. उचीमुळे सैन्यात जमल नाही आणि काकासाहेबानी त्यांना गिरगावात नवाकाळ ऑफिसला बोलावून संध्याकाळ पेपरच्या संपादकपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे ते काकासाहेबाच्या शेवटपर्यत त्यांच्या बरोबर राह्यले. त्यामुळे ते लोकमान्य ट...